नानाजी देशमुख कृषि संजीवणी योजना समिती अवैध ; समिती बरखास्त करण्याची राठोड यांची मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील सकनुर ग्राम पंचायत अंतर्गंत येणाया तांडयास माहिती न देता परस्पर नानाजी देशमुख कृषि संजीवणी योजना समिती स्थापन करण्यात आली असुन ही समिती बरखास्त करावी अशी मागणी मेघु तांडा येथील रमेश राठोड यांनी तहसिलदार यांच्याकडे दि. 05 रोजी केली आहे.

सकनुर ग्राम पंचायत अंतर्गंत मेघु तांडा, जेमला तांडा, बालाजी नगर, मुकिंद तांडा, विठठलवाडी तांडा आहेत. या तांडयावरील नागरीकांना ग्राम सभेत न बोलवता तसेच बंजारा समाजास डावलून ही समिती कोरम अपुर्ण असताना गठीत केली असुन यामध्ये राजकारण असल्याची तक्रार या निवेदनात केली गेली आहे.

यामुळे नानाजी देशमुख कृषि संजीवणी योजना समिती अवैध असुन ती बरखास्त करून दोषीवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.