मुखेडात भरणार सोमवारी बैल व म्हैस बाजार !             शेतकऱ्यांंनी दिले नगर परिषदला निवेदन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

तालुक्यातील शेतकऱ्यांंना बैल व म्हैस विक्री, खरेदी करण्यासाठी 30 ते 40 कि.मी. अंतर कापाले लागत आहे त्यामुळे मुखेड शहरात बैल व म्हैस बाजार भरविण्याची परवानगी दयावी असे निवेदन मुख्याधिकारी नपास दि. 05 रोजी शेतकऱ्यांंनी देण्यात आले.

शहरात यापुर्वी बैल व म्हैस बाजार मोठया प्रमाणात भरत होता पण तो बाजार बंद झाल्याने शेतकऱ्यांंना खुप मोठया प्रमाणात त्रास सहन करत दुरवर जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांंना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे.

शहरातील हुतात्मा स्मारकाच्या पाठीमागे आठवडी बाजारादिवशी दर सोमवारी बैल व म्हैस बाजार  भरण्याची परवानगी दयावी असे निवेदन शेकडो शेतकऱ्यांंनी दिले.


             या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष अनिल जाजु, नगरसेवक शाम एमेकर, प्रा. विनोद आडेपवार,  विजय कोत्तापल्ले ,विलास चौहाण, किशन हाक्के, संभा गुट्टे, संग्राम मुंडे, पांडुरंग जाधव, रामकिशन इंगोले, राम बंडे, माधव इंगोले, अशोक कोलगट्टे, शिवाजी मामीलवाड, विश्वनाथ महाबळे, बालाजी हाक्के, विष्णु कोत्तापल्ले, शिवाजी रुपनर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.