महिलांना स्वरक्षणासाठी कायद्याचे सखोल ज्ञान असावे-शांताबाई येवतीकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / संदीप पिल्लेवाड

आज महिलांकडे समानतेच्या दृष्टीने पाहून त्यांना सन्मानाची वागणुक दिल्या जाते परंतू ब-याच ठिकाणी त्यांचा भेदभाव केला जातो. स्त्री एक उपयोगाची वस्तू म्हणून वागवत असतांना त्यांचा अमानुषपणे छळ केला जातो.

अज्ञानीपणामुळे व त्यांच्यावर असलेल्या दबावापोटी त्या स्त्रिया निमूटपणे त्रास सोसत असतात. जर त्यांना आपल्यावर होणारा अन्याय कसा थांबवावा याविषयीचे ज्ञान मिळाले तर त्या सदैव अानंदात व बिनधोक राहतील म्हणून सर्व महिलांना कायद्याचे पुरेपूर व सखोल ज्ञान असणे हे अत्यंत गरजेचे आहे असे मत महिला संवाद प्रतिष्ठान मुखेड च्या अध्यक्षा शांताबाई येवतीकर यांनी दि.२३ जानेवारी रोजी मैत्री नेटवर्क महाराष्ट्र, ह्युमन राइट्स लाॅ नेटवर्क मुंबई व महिला प्रतिष्ठान मुखेड च्या संयुक्त विद्यमाने शहरातील शासकिय विश्रामगृह आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती अौचित्याने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य व बचत गटातील सर्व महिलांना बालविवाह व कौटुंबिक हिंसाचार या कायद्याचे सखोल मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेतील उपस्थितांना पुणे येथील अॅड.मुकुल इनामदार, पी. के. गायकवाड, शांता मोरे, अॅड.संजय भारदे, अॅड.मिलिंद कांबळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्बतबाई हराळे ह्या होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माधव लव्हटे यांनी केले तर तुकाराम    बा-हाळीकर यांनी उपस्थितांचे अाभार व्यक्त केले.

यावेळी दामू जाहिरे, राजाबाई जाहीरे, चंदरबाई गजेवाड, आम्रपाली कांबळे, ज्योती पैठणे, पुनम कांबळे, सुषमा मामडे, सुलोचना सुडके, किरण भांगे, राजश्री गवलवाड व रेखा कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.