मुक्रमाबाद ग्रामपंचायत बरखास्त करुन नगरपंचायत स्थापण करा – हेमंत खंकरे – “मुख्यमंत्र्याकडे मागणी”

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड
बाराहाळी: पवन कँदरकुंठे
                 मुखेड तालुक्यातील व नांदेड जिल्हातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मुक्रमाबाद या शहराची ओळख आहे. येथील ग्रामपंचायत १७ सदस्यीय आहे तरी. हे ग्रामपंचायत बरखास्त करुन नगरपंचायत स्थापन करण्याचे मागणीचे निवेदन भाजपाचे तालुकाउपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य हेमंत बंडेप्पा खंकरे यांनी मुख्यमंञ्यानकडे निवेदनाद्वारे  केली आहे .
              मुक्रमाबाद हे शहर निजामकालीन तालुका व परिसरातील मोठी बाजारपेठ .विविध शासकीय प्रमुख कार्यालय .अनेक शाळा .महाविद्यालये मुक्रमाबाद येथे आहेत तसेच मुक्रमाबाद शहराची लोकसंख्या 20 हजारांच्या जवळपास आहे .येथे दोन शासकीय विश्रामगृह.बाजार समिती कार्यालये .पोलिस स्टेशन.प्राथमिक आरोग्य केंद्र .अनेक राष्ट्रीयकृत बँका .व नगरपंचायत निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या अनेक अनेक बाबी या ठिकाणी .येथे सर्वच सोयी सुविधा उपलब्ध आहेत परंतु ग्रामपंचायत असल्यामुळे म्हणावा तसा विकास निधी मिळत नाही विकासनिधी न मिळाल्या मुळे  येथील जनता विकासापासुन वंचित राहत आहे.
               म्हणून शासनाने येथील ग्रामपंचायत बरखास्त त्याच रुपांतर नगर पंचायतीत  करुन .मुक्रमाबाद शहराला विकासाची चालना देण्याच काम करावे अश्या आशायचे निवेदन मुख्यमंञी महोदय उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.