एस एफ आय मुखेड तालुका अध्यक्ष पदी अमोल सोनकांबळे तर सचिव पदी सुखानंद गायकवाड यांची निवड

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / पवन जगडमवार
            प्रतिनिधी – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस एफ आय) या विद्यार्थी संघटनेचे 19 वे मुखेड तालुका अधिवेशन आज दि 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता मुखेड शहरातील मास्टे कोचिंग क्लासेस येथिल हॉल मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडले.हे अधिवेशन घेण्यासाठी एस एफ आय चे नांदेड जिल्हा अध्यक्ष विजय लोहबंदे, विशाल बद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी एस एफ आय विद्यार्थी संघटनेची नविन मुखेड तालुका कमिटी करण्यात आली .ही कमिटी एकूण 18 जणांची करण्यात आली, त्यामध्ये मुखेड तालुका अध्यक्ष पदी अमोल सोनकांबळे तर सचिव पदी सुखानंद गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
            तर उपाध्यक्ष म्हणून केरबा होनराव तर सहसचिव म्हणून विजय गवाळे आणि सचिव मंडळ सदस्य म्हणून तिरूपती भूत्तापले तर सदस्य म्हणून शिवा शेळके, ज्ञानेश्वर वडजे, सय्यद रियाज, शेख आरिफ, शेख समिर, शेख मोहम्मद, शंतनु संगारे, साहिल बनसोडे, रमेश गायकवाड, नागराज लोहबंदे, चौधरी इरफान, नागेश चावरे, जांगीड स्वप्निल अदी जणांची निवड करण्यात आली आहे.