धक्कादायक…जालन्यातील प्रेमी युगूलाला बेदम मारहाण, महाराष्ट्र सुन्न करणारी घटना

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा व्हिडिओ समाज माध्यमांवर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जालना जिल्ह्यातील एका प्रेमी युगूलाला जालनातील काही तरुणांनी मारहाण केली आहे. याबरोबरच युगूलाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळही केली आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करणारा तरुण मुलीसोबत बेशिस्त पद्धतीने वागणूक करीत आहे. मुलीसोबत असलेल्या मुलालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारातील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे.

 

मारहाण करणाऱ्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मारहाण करणाऱ्या या तरुणांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. या व्हिडिओवर राग व्यक्त केला जात आहे. कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारची मारहाण करण्याचा हक्क या तरुणांना कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वीही प्रेमी युगूलांना अशा प्रकारची मारहाण केली जात होती. सुरुवातीला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी हा व्हिड़िओ जुना असल्याचा दावा केला होता. त्यानंतर मात्र त्यांनी हा व्हिडिओ आमच्यापर्यंत आला नव्हता. मात्र या व्हिडिओचा तपास करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वक्तव्य केलं आहे. पोलीस याबाबत निष्काळजी राहिले आहे. त्यांच्याही कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभं राहते. सरकार कोणतेही असेल तरी अशा घटनांवर सर्वांनी मिळून काम करायला हवे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षतेने प्रवीण दरेकांनी म्हटले आहे. कायदा सुव्यवस्था नीट राखली नाही तर मुलींना घराबाहेर पडणं अवघड होईल. समाजाची अशी मानसिकता बदलायला हवी, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून येत आहे.