लोहाच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश पवार तर उपाध्यक्ष पदी हनमंत मोरे यांची निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा लोहा

 

लोहा/  इमाम लदाफ

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लोहा शहरात  मोठ्या उत्साहात १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे गेल्या पंधरा वर्षा पासून प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा केला जातो आहे दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गणेश हरिहर पाटील पवार तर उपाध्यक्ष पदी हणमंत मोरे यांची एकमताने निवड झाली आहे.जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर , भाजप तालुकाध्यक्ष शरद पवार याच्या नेतृत्वात हा जयंती सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी सर्वाना सोबत घेऊन कार्यकारणी करण्यात आली आहे

 

लोहा शहरात १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे  १९फेब्रुवारी रोजी .जुन्या लोह्यात    शिवरायांच्या पुतळ्यास लोकनेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता अभिषेक त्यानंतर भव्य मिरवणूक निघणार आहे यांना हत्ती, ४० घोडे ,उंट, आदिवासी नृत्य,  वासुदेव नृत्य ,करमाळा  बँड, लेझीम पथक, भजनी मंडळी , विविध देखावे सह आतिषबाजी व शहरात भगव्या कमानी अशा भव्य दिव्य  जयंती सोहळा होणार आहे

,दरवर्षी हा सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी गेल्या 15 वर्षा पासून खा चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शरद पाटील पवार भास्कर पाटील पवार हे  परिश्रम घेत असतात यंदाही त्यांनी पुढाकार घेतला व युवकांना नेतृत्व संधी दिली आहे

सार्वजनिक शिवजन्मोत्सव अध्यक्ष – गणेश पाटील पवार, उपाध्यक्ष …हणमंत मोरे  सचिव पदी विजय केंद्रे, कार्याध्यक्ष बाळू पवार,, कोषाध्यक्ष -अनिल धुतमल सहसचिव- पिराजी पवार सहकोषाध्यक्ष- श्रीराम पवार प्रसिद्धीप्रमुख इमाम लदाफ यांची सर्वानुमते निवड करणात आली. या बैठकीला सार्वजनिक शिवजयंती समितीचे संयोजक शरद पाटील पवार,  लोहा नगरीचे उपाध्यक्ष केशवराव मुकदम,नगरसेवक छत्रपती धुतमल ,गटनेते करिम शेख  नगरसेवक दत्ता वाले, भास्कर पाटील पवार नारयण येलरवाड, नगरसेवक   ,अरुण येळगे,बालाजी शेळके, केतन खिलारे, खंडू पवार,  गोविंद कदम, हरि कोरडे, , इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती

दरवर्षी लोह्याचे शिवजयंती सोहळा  जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातही आकर्षणाचा केंद्र बिंदू राहिला आहे एक नेत्रदीपक सोहळा म्हणून नावलौकिक मिळविला आहे यंदाही तीच परंपरा आहे पुढे नेऊ या .या सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करू या असे आवाहन संयोजक शरद पाटील पवार व नूतन अध्यक्ष म्हणून गणेश पाटील पवार यांनी केले आहे.