मुखेड तालुका उदगीर जिल्हयात नको ; मुखेडात सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / संदीप पिल्लेवाड

मागील दोन दिवसापासुन अनेक वृत्तपत्रातून व सोशल मिडीयातून नांदेड जिल्हयातील मुखेड तालुका हा नियोजित उदगीर जिल्हयामध्ये समाविष्ठ होणार असल्याचे वृत्त पसरले आहे पण मुखेड तालुका उदगीर जिल्हयात नको अशी भूमिका मुखेडमधील सर्वपक्षीय व सामाजिक कार्यकत्र्यानी घेत नायब पी डी गंगनगर यांना दि. 30 रोजी निवेदन दिले.

तालुक्याची भौगोलिक , सामाजिक, शैक्षणीक व राजकीय संबंधर तसेच व्यवहार पाहता मुखेड तालुक्यासाठी नांदेड जिल्हा हाच उपयुक्त राहणार असुन उदगीर जिल्हयात मुखेड तालुका गेल्यास मुखेड तालुक्याचे खुप नुकसान होईल असेही या निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे मुखेड तालुक्याचे नांदेड जिल्हयातुन इतरत्र कोणत्याही होणा­या जिल्हयात समाविष्ठ करुन नये असे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीराम गरुडकर, डॉ. व्यंकटराव भोसले , दिलीप कोडगीरे, शरद कोडगीरे, गांविंद पाटील जाधव, पत्रकार संदिप कामशेट्टे, सुनिल पौळकर, ज्ञानेश्वर डोईजड , शादुल होनवडजकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्ष­ऱ्या आहेत.