उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाऊन बाबरी मशीद बांधणार, अबू आझमींच्या मुलाची वादग्रस्त टीका

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री 100 दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत.

फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

‘सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निराश’

27 जानेवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात मुंबईत झालेल्या मोर्चाला संबोधित करताना फरहान आझमी म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे अयोध्येत जात असतील तर मीसुद्धा जाईल. आम्ही सर्व जाऊ. मी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आमंत्रित करेन. माझे वडीलही जातील. उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्यासाठी जातील, पण आम्ही बाबरी मशीद बांधायला जाऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही निराश झालो आहोत.’

 

फरहान आझमी म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्याला जाण्याचा निर्णय मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जगभरात 2.5 अरब लोकसंख्या आहे. त्यामद्ये 50 पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशाला आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही’