जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात  राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश ; जिल्ह्यातील 46 शाळांतील एकूण 1450 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुक्रमाबाद / दत्ता पाटील मालेगावे
    मुखेड तालुक्यातील  मुक्रमाबादकरांची येथे  47 व्या जिल्हास्तरीय स्काऊट-गाईड मेळाव्यात  राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देण्यात आला.
               यात जिल्ह्यातील 46 शाळांतील एकूण 1450 विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाने ,आकर्षक देखाव्याने मुक्रमाबाद वासीयांची मने जिंकली. काढलेल्या शोभायात्रेत झांशीची राणी,संत गाडगेबाबा, दांडी यात्रा, वारकरी ,भजनी मंडळ, नंदी बैल,अस्वलाचे सोंग,लेझीम पथक,पृथ्वीचे संरक्षणासाठी, प्रदूषण मुक्तीसाठी,स्वच्छ भारत-प्लास्टिक मुक्ती,देशातील विविध राज्यातील वेशभूषा,व्यसनमुक्ती,विविध वाद्य,छ. शिवाजी महाराज , राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे वेशभूषेसह देखाव्यांचे सादरीकरण केले.
                   येथील छ. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयापासून निघालेली शोभायात्रा मुक्रमाबाद नगरीतून जवळपास 4 किमी अंतर कापून मेळावा स्थळी पोहोचले.शोभयात्रेचे उदघाटन प्राचार्य मुकुंद जाधव व हदगाव चे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
            शोभायात्रेत ठिकठिकाणी बालकांचे स्वागत पुष्पवृष्टीने करण्यात आले तसेच मराठी पत्रकार संघाकडून विद्यार्थ्यांना  खाऊचे वाटप करण्यात आले.
              शोभयात्रेचे स्वागतासाठी गावातील महिलांनी आपल्या घरापुढे रांगोळी द्वारे स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले . शोभायात्रेत शांतता व सुव्यवस्थासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य केले.
              शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी स्काऊट चे जिल्हा चिटणीस बी.पी.कुदाळे,श्रीमती भागीरथी बचेवार,श्रीमती झाडबुके, जिल्हा संघटक दिगंबर करंडे,गाईड जिल्हा संघटक शिवकाशी तांडे,सहायक पोलीस सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे,मेळावा प्रमुख विनोद सोनटक्के व कुमारस्वामी माने,जिल्हा मुख्यालय आयुक्त प्रलोभ कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख शिवानंद स्वामी,रवींद्र जोशी,धनाजी देशमुख,गणेश पणेरकर ,छ. शिवाजी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी,सर्व स्काऊट-गाईड शिक्षक शिक्षिका आशालता स्वामी मुखेड ,एच.एस.खंकरे यांनी परिश्रम केले.