शेतकऱ्यांनी तूर ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी-शिवशंकर पाटील*

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  / पवन जगडमवार
                 सरकारने हमीभावाप्रमाणे तूर खरेदी करण्यासाठी तूर ऑनलाइन नोंदणीला सुरुवात केली आहे.शासनाचा तुरीचा हमीभाव हा प्रतिक्विंटल 5800 रुपय आहे.मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर ऑनलाइन नोंदणी ही खरेदी-विक्री संघ कार्यालयात करायची आहे.अंतिम तारीख 14 फेब्रुवारी आहे.तूर ऑनलाइन करण्यासाठी बँकपासबुक,आधार,सातबारा होल्डिंग,सातबाऱ्यावर पेऱ्याची ऑनलाइन नोंद करून घ्यावी.
            हमीभावाचा लाभ घेण्यासाठी व भावांतर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत तूर ऑनलाइन करून घ्यावी व शेतकऱ्यांना यामध्ये अडवणूक होत असेल तर संपर्क करावा,असे आव्हान शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केले आहे.