काळ्या बाजारात जाणारा गव्हाचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला…! मुखेड तालुक्यातील आंदेगाववाडी येथील घटना

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद / प्रतिनिधी

स्वस्त धान्य दुकान मार्फत गोर-गरीबांना मिळणारा गव्हू हा ट्रक भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून मुखेड तालुक्यातील आंदेगाव वाडी , येथे शनिवार दि २५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पकडण्यात आले असून या गुन्ह्याती ट्रक हा मुक्रमाबाद पोलिस यांच्या ताब्यात दिला आहे. तर पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया चालू असून कारवाईही स्थानिक गुन्हे शाखे कडूनच होणार असल्याचे मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, यांनी सांगितले.
शासना कडून मिळणाऱ्या गव्हू, तांदळाची सर्रास काळ्या बाजारात विक्री होत असल्यामुळेच आज गरीबांना राशनचा माल मिळत नाही. याला प्रशासनाचीही मुखसंमती असल्यामुळेच सर्रास धान्याचा काळा बाजार चालू आहे. मुक्रमाबाद पासून काही अंतरावर असलेल्या आंदेगाववाडी येथे सायंकाळी साडेपाच वाजता एम.एच.बी.ई.४८७८ या आयशर ट्रक मध्ये स्वस्त धान्य दुकानातील प्रत्येकी ५० किलो वजनाचे १४० पोते असे एकूण सात टन गव्हू हा, विक्रीसाठी काळ्या बाजारात जात असल्याची कुण-कुणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली होती. त्या नुसार सापळा रचण्यात आला.पण आपल्या मागावर पोलिस असल्याचे पाहून ट्रक ड्रायव्हर संजय रामोड, यांनी पोलिसांना चकवा देत वा-याच्या वेगात ट्रक पळवून आंदेगाव वाडी येथील मंदिराच्या पाठीमागे लपवून लावला पोलिस पाठलाग करत गावात पोहचले. गाव छोटे असल्यामुळे मंदिराच्या पाठीमागे लावलेला मोठा ट्रक सहजच पोलिसांना दिसून आल्यानंतर लगेचच ट्रक मध्ये असलेला गव्हू ताब्यात घेऊन ट्रक चालकाला हा, माल कोठून आणला? व पुढे कुठे जात आहे.?अशी विचारणा करत वाहतूक परवाना व इतर कागद पञाची विचारणा केली असता ट्रक चालक संजय रामोड व ट्रक मालकाचा भाऊ सदाशिव जाधव, यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे आढळली नसल्यामुळे या दोघांना ताब्यात घेऊन मुक्रमाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे काळा बाजार करणाऱ्यांचे व आपृली आर्थिक तडजोड घडऊन आणून याला मुखसंमत्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणानले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.तर काळ्या बाजारात जाणारा गव्हू पकडून ठेवल्यामुळे या गुन्हायात आपण अडकून पडू नये यासाठी हा माल वैध कसा होईल यासाठी सगळेजण प्रयत्न करीत असून यासाठी प्रशासनातील अधिकारीही आता पुढे सरसावलेले दिसून येत असून यावर आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तर या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ, येळगे,वडजे,जांबळीकर,शिंदे हे, पोलिस कर्मचारी होती .

::–:: नायब तहसिलदार यांना या संबधातील असलेली सर्वच कागदपत्रे घेऊन मुक्रमाबाद येथे बोलावले असून कागदपञे व पकडलेला माल हे, जळऊन आले तर ठीक अन्यथा यातील आरोपीवर लगेचच गुन्हा दाखल करण्यात येईल . – द्वारकादास चिखलीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड .