जिप अध्यक्षा सौ. अंबुलगेकर यांना बा­ऱ्हाळीवर भरोसा नाय का ?   जिप अध्यक्षा झाल्या तरी निवडून दिलेल्याच मतदाराकडे फिरवली पाठ

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड
    मंत्री अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वावर भरोसा ठेवून मतदारांनी दिले होते निवडूण

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील बा­ऱ्हाळी जि.प. गटातील जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगाराणी सुरेश आंबुलगेकर नुतन जि.प. अध्यक्षा झाल्या तरी ज्या मतदारांनी निवडूण दिले त्याच मतदार राजाकडे त्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसत आहे.

तशा त्या लोकसभेपासुन मतदार संघात फिरकल्या नसल्याने त्यांच्या विरोधात बा­ऱ्हाळी गटात कमालीची नाराजी असुन सुध्दा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सौ. अंबुलगेकर यांना जि.प.अध्यक्ष बहाल केले.

त्या जि.प. अध्यक्षा झाल्या असल्या तरी बा­ऱ्हाळी गटात मात्र कुठेच फटाके फुटलेले दिसले नाहीत कारण येथील नागरीकांच्या अनेक समस्या आजही तशाच पडून असल्याचे चित्र आहे. नांदेडमध्ये हार तुरे घेत असल्या तरी बा­ऱ्हाळी गटातील गोर गरीब नागरीक अजुनही जिप सदस्यांच्या चेहरा पाहिला नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली त्यामुळे सौ. अंबुलगेकर यांना त्यांचाच जि.प. गट असलेला बा­ऱ्हाळी जिप मतदार संघावर भरोसा नाय काय ? असा प्रश्न येथील नागरीक उपस्थित करीत आहेत.

बा­ऱ्हाळी गटातील नागरीकांची बँकेत अडवणूक, पिक विम्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न,टंचाईचा प्रश्न, गावातील भौतिक सुविधेचा प्रश्न,

शेतक­ऱ्यांंचे अनेक प्रश्न आ करुन समोर असताना सौ. अंबुलगेकर हया जि.प. अध्यक्षा होऊनही बा­ऱ्हाळीकडे पाठ फिरवल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर भरोसा ठेऊन येथील नागरिकांनी निवडून दिले असले तरी जि प अध्यक्षा सहित मंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावरही  येथील नागरीक नाराज असल्याचे चित्र आहे कारण येथील जनतेला या जि.प. अध्यक्ष पदाचा कोणतेही सुख – दुख  नसल्याचे येथील नागरीकांनी म्हटले आहे.
…………………………………………………….
  येथील नागरीकांच्या अडचणी जि.प.अध्यक्षांना समजू शकणार नाहीत कारण त्यांचा येथील काही मोजक्याच लोकांचा संपर्क तेथेही कार्यक्रमापुरता येतो. त्यांच्याकडून मतदारांना भेटणे ही अपेक्षाच करणे चुकीचे असुन बा­ऱ्हाळी जि.प.गटाला लोकप्रतिनिधीच अस्तित्वात नसल्याचे म्हटले तरी योग्य होईल. तर मागील अडीच वर्षाच्या काळात येथील कोणतीच समस्या त्यांनी सोडविली नसून येणाऱ्या काळात त्या किती न्याय देऊ शकतील यातही शंका आहे.

शिवशंकर पाटील कलंबरकर
जि.प. बा­ऱ्हाळी , एक मतदार 

          युवाजिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना, नांदेड