मुखेडात वंचित बहुजन आघाडीच्या बंदला समिश्र प्रतिसाद

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
                केंद्र सरकारने लागू केलेल्या सी.ए.ए. कायदयाला व लागु होणाया एन.आर.सी. कायदयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या मुखेड बंदला समिश्र प्रतिसाद दिसून आला.
                केंद्रसकारने सी.ए.ए.व एन.आर.सी. कायदे देशात आणुन नागरीकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असुन हा कायदा रद्द करुन जनतेला न्याय दयावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुखेडातील बाजारपेठ काही ठिकाणी चालु होती या बंदला म्हणावा तसा प्रतिसाद दिसुन आला नाही.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत करुन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. यशवंत कांबळे, अॅड संजय भारदे, गंगाधर सोंडारे, अॅड तानाजी सिरसे, रविराज भद्रे, सिध्दार्थ बेळीकर, पाशाभाई शेख, डी.पी. वाघमारे, गौतम गावंडे, डी.डी. वाघमारे, रवि ढवळे, पी.जी. भद्रे, भारत सोनकांबळे, संदिप कांबळे, संतोष कांबळे, तुकाराम गायकवाड,कमलाकर घोडके यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.