पेठवडज येथे एक दिवसीय धम्मपरिचय शिबीर संपन्न 

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड पासून जवळच असलेल्या पेठवडज येथे त्रिरन्त बौध्द महासंघ नांदेड यांच्या वतीनेएक दिवसीय धम्मपरिचय शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

या धम्मशिबीराची सुरूवात महामानवास धम्मचारी चंद्रगर्भ नांदेड, धम्मचारी आनंदगर्भ मुखेड  ,यांनी पुष्प अर्पणकरून अभिवादन करण्यात आले तर धम्ममित्र व्यंकटराव गायकवाड  व  धम्ममित्र एम. टी. वाघमारे यांनी त्रिसरण पंचशिल, विधायक पंचशिल, बुध्दपूजा या  गाथेचे पठण केले.

या शिबिरामध्ये अनापानसती ध्यान, व  मैत्री भावना ध्यान, यावरील माहिती  व  प्रत्यक्ष ध्यान सराव धम्मचारी आनंदगर्भ मुखेड यांनी करुन घेतले, व दुसर्‍या सत्रात धम्मचारी चंद्रगर्भ नांदेड, यांनी आज  जगाला धम्माची गरज का? या  विषयावर सखोल असे प्रवचन दिले.  हे शिबीर यशस्वी  करण्यासाठी आनंदराव लोहबंदे,  धम्ममित्र व्यंकटराव  गायकवाड, भिमजंतीमंडळ पेठवडज यांच्यासह अनेकांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एन टी वाघमारे तर आभार आनंदराव लोहबंदे यांनी केले.