शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार – जि.प.उपाध्यक्षा पदमा सतपलवार

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

नांदेड : प्रतिनिधी

शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन शिक्षकांचे प्रलंबित  असलेले प्रश्न संंघटनेने पदाधिकारी व मा. शिक्षणाधिकारी  यांच्या समक्ष चर्चा करुन सोडवण्यात येईल असे आश्वासन जि.प.च्या उपाध्यक्षा श्रीमती पदमा सतपलवार यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांंदेड च्या वतीने दि.23 जानेवारी रोजी 2020 रोजी , जि.प.नांंदेड चे नवनियुक्त अध्यक्ष सौ.मंगाराणी अंबुलगेकर , उपाध्यक्षा श्रीमती पदमा सतपलवार यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी सत्कारानंतर  यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर , तानाजी पवार , रवि बंडेवार , गंगाधर कदम , अविनाश चिद्रावार , गंगाधर ढवळे, गंगाधर करेवाड , संजय मोरे , बालाजी भांगे , बस्वराज मठवाले , संतोष घटकार सर , वसमतकर एम .एन सर , क्षीरसागर सर  उपस्थित होते.