स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या महिलांसाठी विनामुल्य अभ्यासिका

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा
नांदेड : वैजनाथ स्वामी
             जिल्ह्यातील बेरोजगार, स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु महिला उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कैलास नगर वर्कशॉप रोड नांदेड यांच्या मार्फत  विनामुल्य अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे.
            या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलींसाठी ग्रंथालय विभागामध्ये वाचनासाठी विविध स्पर्धा परिक्षेची पुस्तके दिली जातात. विविध वर्तमानपत्रे वाचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. अभ्यासिकेत मोफत प्रवेश देणे चालु असून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या होतकरु महिला उमेदवारांनी शासनाच्या या मोफत अभ्यासिकेचा लाभ घेऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रा. सो. खंदारे सहायक यांनी केले आहे