मुक्रमाबाद येथील जवान सय्यद इब्राहीम बाबुसाब यांना पदोन्नती 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / प्रतिनिधी
              मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील भुमीपुत्र व जम्मु काश्मीर आर्मी मेडीकल कोर येथे कार्यरत असलेले जवान सय्यद इब्राहीम बाबुसाब यांच्या कार्याची दखल घेऊन नायक हवालदार पदी पदोन्नती देण्यात आल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
    मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद सारख्या ग्रामीण भागातील तरुण सय्यद इब्राहीम बाबुसाब हा जवान लहान पणा पासुनच हुशार होता.यांचे पहीली ते बारावी पंर्यतचे शिक्षण गावात झाले.कुंटूब मोठे असल्यामुळे  त्यात परिस्थिती नाजुक असल्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही.वडील च्या व्यवसायाला मदत करीत बाकी शिक्षण गावात घेतले.पण हिमंत न हारता देश सेवा करण्याचा निर्धार उरासी बाळगून सय्यद इब्राहीम हे जानेवारी २०१२ मध्ये सैनिक म्हणून भरती झाले.
              या गावातील आठ जवान देश सेवा बजावत आहेत.सय्यद इब्राहीम हे जवान वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली असल्याने यांच्या कार्याची दखल घेऊन संबंधित विभागाकडुन आर्मी मेडीकल कोर जम्मु काश्मीर येथे कार्यरत असलेले सय्यद इब्राहीम बाबुसाब या जवानाला नायक हवालदार पदी पदोन्नती देण्यात आल्यामुळे सरपंच शिवराज आवडके,सुरेश पंदीलवार,गंगाधर चामलवाड,विनोद आपटे,लक्ष्मण कोळेकर ,मझर पठाण सह आदीने अभिनंदन केले आहे.