देगलूर  – खानापुर फाट्याजवळ वाहनाच्या तिहेरी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
देगलूर : विशाल पवार
           मालवाहू ट्रक – बोलेरो जीप –  पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर मालवाहू वाहनाचा चालक यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. 
            ही घटना खानापूर फाट्याजवळील जीरो फाट्याजवळ गुरुवारी ता. २३ रोजी सकाळी १०-०० वाजता घडली अपघातावेळी रस्त्यावर एक पाण्याची वाहतूक करणारा आटो थांबून होता त्यामुळे या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली .
            देगलूर नांदेड रोड खानापूर फाट्यानजीक असलेल्या झिरो फाट्यावर मालवाहू ट्रक क्रमांक एम. एच.४ जेके ७१२४ हे वाहन हैदराबाद वरून नांदेड कडे जात होते तर बोलेरो पिकप क्रमांक एम. एच. २६ बि. ई. ३४४७ हे वाहन नांदेड वरून देगलूर कडे येत होती तर याच रस्त्यावर ऑटो क्रमांक ८८५४ थांबून होते त्यामुळे या दोन वाहनाची समोरा-समोर जोराची धडक झाली या अपघातात बोलेरो वाहनाचे इंजिन वीस फूट लांब जाऊन पडले या झालेल्या अपघातात बोलेरो चालक माधव धोंडीबा हनमंते राहणार माळकौठा नांदेड हा जागीच ठार झाला तर मालवाहू ट्रक क्रमांक चालक गजानन गंगाधर डोईफोडे हा गंभीर जखमी झाला.

          त्याच्यावर देगलूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली ही घटना गुरुवारी सकाळी १०-०० वाजता घडल्याने काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली रस्त्यात थांबलेल्या आटोचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात आले याप्रकरणी देगलूर पोलिसात अपघाताची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे