मॉलमध्ये मुकाटपणे पैसे मोजता ना…मग शेतकऱ्याच्या भाजीचे दर का पाडून मागता – नाना पाटेकर….. भाजी घेताना मोल करु नका असं आवाहन यावेळी नाना पाटेकर यांनी केलं आहे

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

भाजी घेताना मोल करु नका असं आवाहन यावेळी नाना पाटेकर यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कलारंग सांस्कृतिक कला संस्थेतर्फे नाना पाटेकर यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती.

यावेळी नाना पाटेकर यांनी अनेक प्रश्नावर दिलखुलास उत्तरं दिली. “कांद्याचा दर वाढला की बजेट कोलमडलं अशी आरडाओरड सुरु होते. तुमचे एखाद्या महिन्याचे बजेट कोलमडले तर काय फरक पडतो. त्या बळीराजाचं आयुष्याचं बजेट कोलमडलं आहे. त्याचाही कधीतरी विचार करा. मॉलमध्ये मुकाटपणे पैसे मोजता आणि शेतकऱ्याच्या भाजीचे मात्र दर पाडून मागता. भाजीचे मोल करु नका,” असं नाना पाटेकर यांनी म्हटलं.