अनुसुचित जाती, नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी विशेष घटक योजना, बीजभांडवल योजना

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा
नांदेड : वैजनाथ स्वामी
        राज्य शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्यादित) यांच्याकडून पुढील योजनेंतर्गत ऑनलाईन कर्जासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
               विशेष घटक योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50  हजार रुपयापर्यंत प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार अनुदान देण्यात येते. राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँकेच्या कर्जावर नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे तीन वर्षात करावयाची आहे. बीजभांडवल योजनेंतर्गत 50 हजार 1 ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. प्रकल्प त्यामध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के त्यामध्ये 10 हजार रुपये अनुदान व उर्वरित कर्ज 4 टक्के व्याजाने तसेच बँकेचा सहभाग 75 टक्के व अर्जदाराचा सहभाग 5 टक्के याप्रमाणे कर्ज दिले जाते. या कर्ज योजनेंतर्गत कर्ज मागणीसाठी लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामध्ये मुदतीत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्राच्या स्वंय साक्षांकित प्रतीसह कर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करावेत. सॉफ्ट कॉपी कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात दाखल करावी.


           सोमवार 20 जानेवारी 2020 पासून ते 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज करता येईल. महामंडळाच्या www.mahatmaphulecorporation.com/sca.mm या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. सन 2019-20 या वर्षासाठीचे अर्ज त्याच आर्थीक वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येतील. यापुर्वी केलेले कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करताना अर्जदाराने वैयक्तिक माहितीच्या कागदपत्राच्या प्रती अपलोड कराव्यात. व्यवसायिक माहितीचे तसेच साक्षीदार, जामीनदार यांच्या कागदपत्राच्या स्वंय साक्षांकित करुन जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात सक्षम येऊन दाखल कराव्यात. अर्जदाराने कोणत्याही गैर व अनाधिकृत व्यक्तीशी संपर्क करुन नये. अडचणीबाबत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास संपर्क साधावा. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विहित नमुना तसेच आवश्यक कागदपत्राची सूची इत्यादी तपशील पाहण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस. एस. भोसले यांनी दिली आहे.