मुंबईतून १२ बांग्लादेशी घुसखोरांना अटक ; मुंबई पोलिसांची कारवाई

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

महानगरामध्ये अवैधरित्या घुसलेल्या बांग्लादेशीयांवर कारवाई मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. या बांग्लादेशीयांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. याबद्दल पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून पोलिसांनी १२ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काही बांग्लादेशी नागरिक कायद्याचं उल्लंघन करून भारतात घुसून मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. यानंतर संपूर्ण मुंबई आणि उपनगरांमध्ये याचा शोध सुरू होता. अंधेरीमध्ये काही बांग्लादेशी राहत असल्याची खबर पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर मोठा सापळा रचत या ठिकाणी पोलिसांच्या एका पथकाने छापा टाकला.

हे बांग्लादेशी भारतात अवैधरित्या का शिरले याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, आपल्याच परिसरात अशा प्रकारे घुसखोरी करून बांग्लादेशी नागरिक असल्यामुळे स्थानिक मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये तब्बल १२ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.