नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने महिला शेतकऱ्याच्या खात्यातून परस्पर कर्ज उचलले  ; न्याय नाही मिळाल्यास परिवाराचा आत्मदहनाचा इशारा —– तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन —

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड 
              मुखेड तालुक्यातील आंबुलगा ( बु ) नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने महिला शेतकऱ्याच्या परस्पर कर्ज उचलले असल्याने दोषीवर कार्यवाही करून न्याय द्यावा अन्यथा  परिवाराचा आत्मदहनाचा इशारा तहसीलदार मुखेड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना पवन जगडमवार यांनी दि २० रोजी निवेदन देऊन दिला आहे. 
             अंबुलगा येथील महिला शेतकरी नागमनी गंगाधर जगडमवार यांच्या खात्यातून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सोसायटीचे कर्ज परस्पर उचलले आहे  माहिती मागितली असता बँक टाळाटाळ करीत आहे असल्याचे नमूद आहे.
                     तर येथील कर्मचाऱ्यांनी व सोसायटीच्या लोकांनी परस्पर कर्ज उचलले असून त्यासाठी बँक कर्मचाऱ्यांंनी आधार कार्डची मागणी केली असता याबाबत प्रश्न विचारला असता “” तुमच्या नावाने सोसायटीचे कर्ज उचलले आहे ते माफ करण्यासाठी आधार कार्ड लिंक करावे लागते  असे म्हणाले. पण कर्जच उचलले नसल्याने याबाबत मोठा घोळ दिसून येतो . याबबाबत लेखी माहिती मागितली असता अद्याप बँकेने उत्तर दिले नाही.


               परिवारातील कोणत्याही सदस्याने १० वर्षात कोणतेही व कशाही प्रकारचे कर्ज उचलले नाही.  अशा प्रकारची फसवणूकीची चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात घोटाळा बाहेर येवू शकतो.  या प्रकरणाने आई  – वडिलांनी आत्महत्या केली असती तर याला कोण जबाबदार ?  असा सवाल करीत महिला शेतकरी नागमनी जगडमवार यांचे पुत्र पवन जगडमवार यांनी तहसीलदार मार्फत  जिल्हाधिकारी नांदेड यांना दि. २१ रोजी बँकेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात निवेदन दोषीवर कार्यवाही करावी, आईच्या नावाने उचलले कर्ज दोन दिवसात परत मिळवून द्यावे अन्यथा बँकेसमोर संपूर्ण परिवारासहित अमरण उपोषण सहित आत्मदहनाचा इशारा दिला आहे.