“त्या” नराधमांना कठोर कार्यवाही करुन पीडीत मुलीस न्याय दयावा – टायगर ग्रुप

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

शंकरनगर येथील साईबाबा विद्यालय येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या त्या चार शिक्षकांवर कठोर कार्यवाही करुन पीडीत मुलीस न्याय देण्यात यावा अशी मागणी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यचे तालुकाध्यक्ष धनराजसिंह चौहाण यांनी दि. 21 रोजी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पीडीत मुलीची प्रकृती चिंताजनक असुन सदर खटला जलद न्यायालयात चालवण्याची मागणीही यावेळी केली. या निवेदनावर तालुकाध्यक्ष धनराजसिंह चौहाण, तालुका प्र. दयानंद गायकवाड, असलम शेख, माधव गोपनर, मनोज गंदपवाड, बाळु आडगुलवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.