धर्माबाद पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे मारुती कागेरू तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे चंद्रकांत वाघमारे यांची बिनविरोध निवड.

ठळक घडामोडी धर्माबाद नांदेड जिल्हा

धर्माबाद -तालुका प्रतिनिधी

धर्माबाद पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेचे मारुती कागेरू तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत वाघमारे या दोघांचा प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता परिणामी या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती पीठासीन आधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

धर्माबाद पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीवरून दि 6 जानेवारी रोजी मोठा राडा झाला होता म्हणून त्या दिवशीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज दि 20 रोजी सदरील निवडणूक होती दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच नामांकन अर्ज सादर करण्यात आल्याने सभापती म्हणून शिवसेनेचे मारुती कागेरू व उपसभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सभापती पद ओबीसी पुरुष साठी राखीव होते व त्याकरिता एकमेव सदस्य शिवसेनेचे मारुती कागेरू होते.
पीठासीन आधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके,सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे,नायब तहसीलदार सय्यद उमर आदिंनी कामकाज पाहिले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक जिंकली व आजही राष्ट्रवादीमध्येच आहे अशी प्रतिक्रिया उपसभापती चंद्रकांत वाघमारे यांनी दिली
पंचायत समिती मध्ये चार पक्षाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत कामकाज करीत असताना अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही ठरल्या प्रमाणे काम केलो मी पूर्वीही शिवसेनेत होतो आजही शिवसेनेतच आहे अशी प्रतिक्रिया सभापती मारुती कागेरू यांनी दिली.
दहशत निर्माण कराल तर गाठ माझ्याशी आहे-मा आ गोरठेकर सभापती व उपसभापती पदाच्या निवडीवरून पूर्वी जो गोंधळ घातला तो गोंधळ म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रकार असून उमरी प्रमाणेच धर्माबाद देखील माझेच आहे आणि येथे कोणीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे अशा प्रकारचा इशारा माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी दिला आहे.

नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी लोकाभिमुख काम करावे असेही ते यावेळी म्हणाले