दानात मिळालेल्या  कपड्यातील बारा हजार रुपये वासुदेवाने केले परत .. वासुदेवाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन  

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

नांदेड : प्रतिनिधी

नांदेड शहरातील (  श्रीनगर ) विवेक नगर येथील कमलबाई  खंदारे यांनी वसुदेवास  दानरुपी म्हणून  कपडे दिले त्या कपड्यात 12 हजार रुपये  रक्कम होती. ती रक्कम  वासुदेव अशोक घोगरे यांनी प्रामाणिकपना दाखवीत परत केली.
  वासुदेव अशोक घोगरे हे नेहमीप्रमाणे सकाळी दान मागण्यासाठी गेले असता दान देण्याऱ्या कमलबाई खंदारे ह्या दानात कपडे दिल्या सदर कपडे घरी आणले असता कपड्यांत 12 हजार रुपये घोगरे याना रक्कम दिसली.
     हा प्रकार वकील धम्मपाल  कदम यांना सांगितले असता वासुदेव घोगरे भाग्यानगर पोलीस स्टेशन ला ही माहिती सांगितली असता कमलबाई खंदारे  यांना बोलावून ती रक्कम परत करण्यात आली .
        यावेळी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे एपीआय विशाल भोसले तर अमित लिंबेकर , संदीप घोगरे,  रामदास हादवे आदी उपस्थित होते.
     वासुदेव अशोक घोगरे यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडविल्याने सर्व स्तरातून व समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे .