खोटया तक्रारी करुन महिला सरपंचाची जाणीवपुर्वक बदनामी – सरपंच सौ. मुंगनाळे ….. न्याय नाही मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा इशारा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड :  ज्ञानेश्वर डोईजड
                सरपंच पदाच्या कालावधीत गावात विविध योजना राबविल्या असुन ग्राम पंचायतच्या कामाची व्हिडीओ शुटींग करुन जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर केलेला असताना सुध्दा खोटया तक्रारी करुन महिला सरपंचाची जाणीवपुर्वक बदनामी करत असल्याचा आरोप मुखेड तालुक्यातील बामणी गावच्या सरपंच सौ. वर्षा पांडव मुंगनाळे यांनी दि. 18 जानेवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी निवेदनात केला आहे.
           जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्राम पंचायतच्या कामाची तीन वेळा चौकशी झाली असुन उपोषण करण्याचा करुन विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न आहे. उपोषणास बसलेले लोक गुंड प्रवृत्तीचे असुन त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत असे या निवेदनात नमुद आहे.
             तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत शौचालयाची केलेली कामे पुर्ण असुन उर्वरीत लाभार्थ्याची नावे ओ.डी.एफ. व फिजीकली दाखवली सुध्दा आहे कारण हागनादरीमुक्त करण्यासाठी तसा आदेश जिल्हा परिषद कार्यालयाकडून आहे त्यामुळे त्याबाबत अहवाल पंचायत समिती मुखेडकडे सादर केलेला असल्याचेही नमुद आहे.
                       गैरव्यवहार व अपहार केलेला नसतानाही प्रशासनाची व ग्रामसेवकाशी चौकशी न करता महिला सरंपचाची वारंवार चौकशी करुन बदनाम करीत असुन याबाबत योग्य तो न्याय मिळावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेख नबीसाब , तुकाराम जाधव, कपिल जाधव, शेख दस्तगीर यांच्या विरोधात अमरण उपोषणास बसण्याचा इशारा महिला सरपंच सौ. वर्षा पांडव मुंगनाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

      ग्रामसेवक निलंबित असताना सरपंच व सरपंचाच्या पतीच्या नावे आर्थिक व्यवहार  केल्याची व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामाच्या चौकशीसाठी तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बामणी येथील विजयकुमार जाधव व नबीसाब शेख अमरण उपोषणास बसले आहेत.