शिक्षकांचीच शाळेला दांडी ; पालकांनीच लावले जि.प.शाळेना कुलुप मुखेड तालुक्यातील लादगा येथील घटना ; तालुक्यात दांडी बहाद्दर शिक्षकांत वाढ

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील लादगा येथील जि.प. प्राथमिक शाळेत चक्क शिक्षकच शाळेला दांडी मारल्याने गावातील सर्व पालक व सरपंच एकत्र येऊन दांडी बहाद्दर शिक्षकांना कंटाळुन शाळेलाच कुलुप लावल्याची घटना दि. 15 रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लादगा येथे पहिली पाचची पर्यंत शाळा असुन या शाळेत 60 ते 70 विद्याथ्र्यांच्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेतात पण कधीही शाळेत आले की, शाळेत शिक्षक गैरहजर असतात अन मनामानी कारभार करुन विद्यार्थ्याना सुट्टी आहे असे सांगत असतात यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने साधारण पस्तीस पालकांनी व सरपंच एकत्र येऊन चक्क शाळेला कुलुप लावून दांडी मारणा­या शिक्षकांविरोधात गटशिक्षणाधिकारी राम भारती यांना तक्रार केली आहे.

मागील काही दिवसापुर्वीही असाच प्रकार घडला होता कार्यवाही न करता शिक्षकास सोडुन दिले होते आणि असा प्रकार अनेक शाळेवर चालू आहे पण याकडे शिक्षण विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने अशा दांडी बहाद्दर शिक्षकांंचे मनौर्धेर्य वाढत चालले आहे.

……………………………………..
याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना त्या शिक्षकावर कार्यवाहीचे पुर्णपणे निर्देश दिलेले आहेत. अशा शिक्षकांना शिक्षण विभाग कठोर कार्यवाही करेल.

प्रशांत दिग्रसकर
शिक्षणाधिकारी (प्रा.) नांदेड
………………………………….
शाळेला सुट्टी देऊन शिक्षक निघुन गेले होते याबात मुख्याध्यापक यांना विचारले असता ते मला विचारुन गेले नाहीत असे म्हणाले. असा प्रकार वेळोवेळी होतो याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
कोंडीबा सोनटक्के, पालक, लादगा

……………………………..
या प्रकरणी चौकशी अहवाल मागविला असुन चौकशीअंती दोषीवर कडक कार्यवाही करण्यात येईल.
राम भारती, गटशिक्षणाधिकारी, मुखेड