मुखेडच्या भाग्यश्री जाधवची आयवाज -2020 स्पर्धेसाठी निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा राष्ट्रीय

मुखेड /  पवन जगडमवार 

       मुखेड तालुक्यातील होनवडज या गावची रहिवाशी असलेल्या भाग्यश्री माधवराव जाधव या हुरहुन्नरी दिव्यांग खेळाडूची 20 ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत थायलंड येथे होणार्‍या जागतिक ‘आयवाज’ 2020 स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

          तर या स्पर्धेत महाराष्ट्रा बरोबरच भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान भाग्यश्री जाधवला प्राप्त झाला आहे.  राज्य व राष्ट्रीय पॅराअ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर तिची निवड गतवर्षी चीन येथे झालेल्या पॅराअ‍ॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पीअनशीप स्पर्धेसाठी झाली होती. 

      सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्री जाधव हिने आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असून देखील जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर तिने हे यशोशिखर गाठले  तर भाग्यश्री जाधव हिची मेहनत पाहून हिंगोलीचे येथील मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी काही महिन्यापूर्वी पालकत्व  स्वीकारले होते.