सरकार तरी किती वेळा शेतकऱ्याची कर्जमाफी करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. ते म्हणाले “महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे आहे”.

पुढे थोरात म्हणाले की, “अजून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकयांचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरीत आहेत. त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे आहे.