Wednesday, March 03, 2021

उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला, संभाजीराजेंची ट्विटद्वारे प्रतिक्रिया

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

 

मुंबई | दिल्लीमध्ये भाजप नेत्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर यावरुन प्रचंड विरोध पाहायला मिळतोय. या पुस्तक प्रकाशनामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपात गेलेल्या वंशजांना हे मान्य आहे का? असा सवाल केला. यानंतर छत्रपती संभाजी राजे आणि राऊत यांच्यातील ट्विट युद्ध सुरू झाले आहे.  संजय राऊतांच्या ट्विटनंतर संभाजीराजे भोसलेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊतांनी ट्विट करत संभाजी राजेंवर निशाणा साधला होता. ‘सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांचया वंशजांनो बोला.. काहीतरी बोला..’ असे ट्विट त्यांनी केले होते. यानंतर संभाजीराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut

@rautsanjay61

सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला..

View image on Twitter
619 people are talking about this

संजय राऊतांच्या ट्विटनंतर संभाजीराजे म्हणाले की, ‘उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.’

Sambhaji Chhatrapati

@YuvrajSambhaji

उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena

1,615 people are talking about this

तर त्यावरुन संजय राऊतांनी पुन्हा संभाजी महाराजांना सवाल केला आहे. मा.छत्रपती संभाजी राजे, आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले ?ज्या मुळे छत्रपती घराणयाचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल.धन्यवाद आणि जय महाराष्ट्र असं ट्विट राऊतांनी संभाजी महाराजांच्या ट्विटला दिलं आहे. त्यामुळे भाजपाने आणलेल्या या पुस्तकावरुन महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वाद होताना चित्र दिसत आहे.

Sambhaji Chhatrapati

@YuvrajSambhaji

उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena

Sanjay Raut

@rautsanjay61

मा.छत्रपती संभाजी राजे
आम्ही आपला नेहमीच आदर करतो..संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले ?ज्या मुळे छत्रपती घराणयाचा अवमान झाल?हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने च चालत आहे. सदैव चालत राहिल.धन्यवाद आणि जय महाराष्ट्र

377 people are talking about this

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही केली जाऊ शकत नाही. असे म्हणत खासदार संभाजीराजे यांनी पुस्तकावर तातडीनं बंदी घालण्यात यावी अशी भूमिका घेतली आहे. याविषयी ते म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदींची तुलना किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली जाऊ शकत नाही. भाजपच्या कार्यालयामध्ये जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्राचेही एक खासदार उपस्थित होते. या पुस्तकावर राष्ट्रीय अध्यक्षांनी ताबडतोब बंदी आणावी. कोणत्याही व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली जाऊ शकत नाही. महाराजांच्या घरात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे हे बोलण्याचा मला अधिकार आहे,’  असे म्हणत संभाजीराजेंनी संताप व्यक्त केलाय.

 

error: Content is protected !!