मुखेड येथे आ. डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते  जिजाऊ नगर फलकाचे अनावरण

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
      स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ नगर फलकाचे अनावरण मुखेड – कंधार विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते ता. १२ रोजी रविवारी सकाळी १२ .०० वाजता राष्ट्रमाता  जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
      यावेळी जिजाऊ ज्ञानमंदिरचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.विरभद्र हिमगीरे, नगरसेवक जगदीश बियाणी, नगरसेवक दिपक मुक्कावार, नगरसेवक राजकुमार बामणे, नगरसेवक गोविंदराव घोगरे, नगरसेवक विजय कोत्तापल्ले, पत्रकार किशोर चौव्हाण, ज्ञानेश्वर डोईजड, महेताब शेख , परफेक्ट इंग्लिश स्कूल पेटवडज चे संस्थाचालक गोविंदराव केंद्रे , विश्वांभर पाटील मसलगेकर, गणेश पाटील जाधव , विनोद दंडलवाड, राजेश गजलवाड, दिगांबर सोनटक्के गुरुजी, राजू रणभिडकर आदी मान्यवर उपस्थित होते .
      यावेळी विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड  म्हणाले की, जिजाऊ ज्ञानमंदिर शाळेने अल्पावधीतच मेहनत करून आपल्या विद्यार्थ्यांत बौद्धिक गुणवता प्राप्त करून पालकामध्ये फार मोठा विश्वास कमावला आहे. यामुळे ही शाळा प्रगतीपथावर आहे.
      शाळेपर्यंत पक्का मजबूत रस्ता  व नदीवर बंधारा बांधून देण्याचे अभिवचन आमदार डॉ. तुषार राठोड  यांनी यावेळी दिले .
    संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार मेहताब शेख यांनी केले. यावेळी जगदीश जोगदंड, जगदीप जोगदंड, भानुदास इंगोले, दिगांबर इंगोले, बालाजी इंगोले, दत्ता इंगोले, गजानन पेड, अजित जाधव, मोहन अंदुरे, प्रल्हाद इंगोले, आनंद सदाशिवराव पाटील,गोविंद पाटील आदी सह बहुसंख्य परिसरातील नागरिक उपस्थित होते.