ग्राहक पंचायत संघटनेच्या वतीने पत्रकार व वकील बांधवाचा सत्कार संपन्न

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / संदीप पिल्लेवाड

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांच्या जंयतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय युवा दिवस निमीत्त राज्याध्यक्ष डाॅ विजय लाड यांच्या संकल्पनेनुसार व जिल्हा कार्यकारणी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुखेड तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेची महत्वपूर्ण बैठक जिल्हा सचिव अशोक बच्चेवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासकिय विश्रामगृह येथे दि. १२ जानेवारी रोजी घेण्यात आली या बैठकीत पत्रकार बांधव व अभिवक्ता संघाच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव अशोक बच्चेवार होते तर प्रमुख पाहुने म्हणून अभिवक्ता संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मदनेश्वर कदम, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे सल्लागार सुशील पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती
शासकिय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व अभिवक्ता संघाचे नवनिर्वाचित पदाधिकारी, ग्राहक पंचायतचे मुखेड तालुकाध्यक्ष सतिषसिंह चौव्हाण,उपाध्यक्ष रामेश्वर पाटील इगोंले, संघटक बालाजी वाडेकर, सहसंघटक सुनील मुक्कावार, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड,सदस्य बालाजी गुडमेवाड, अॅड दत्ता हाक्के, संजय कांबळे, यांची उपस्थिती होती यावेळी अशोक बच्चेवार, अॅड आशिष कुलकर्णी, अॅड मदनेश्वर कदम,रियाज शेख दत्तात्रय कांबळे, अॅड लक्ष्मण सोमवारे, रामेश्वर इंगोले, ज्ञानेश्वर डोईजड, यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संपादक जयभिम सोनकांबळे यांनी केले तर प्रस्तावणा सतिषसिंह चौ्व्हाण यांनी केले उपस्थितांचे आभार ग्राहक पंचायतचे प्रसिद्धीप्रमुख महेताब शेख यांनी मानले