एसटी हिच सुरक्षित प्रवासासाठी सर्वोत्तम  – संभाजी शिंदे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड आगारात सुरक्षितता मोहीमेस शुभारंभ .
मुखेड / संदीप पिल्लेवाड
       मागील ७१ वर्षापासून एस.टी.प्रवाशांना सुरक्षित सेवा देते.आज महाराष्ट्रात दर दिवस ६५ हजार पेक्षा ज्यास्त प्रवाशांची ने – आन करते.ते केवळ कार्यकुशलता असलेले चालक,वाहक,व कर्मचा-यांच्या बळावर या मुळेच प्रवाशांच्या मनातील एस.टी.ची आश्वासक प्रतिमा जपून एसटिला  प्रगतिकडे न्यावे.त्या साठी प्रवाशांची  सुरक्षितता, वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरिर पृक्रती ,व मन:स्वास्थ या चतुसुञिचे पालन केल्यास प्रवासी आणि एसटिचे नाते टिकेल व एसटी हिच सुरक्षित प्रवासासाठी सर्वोत्तम. ठरेल असा विचार आगार व्यवस्थापक एस.टि.शिंदे हे दि.११ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान राबवन्यात येत असलेल्या सुरक्षितता पंधरवाडा कार्यक्रमावेळी  दि.११ जानेवारी   रोजी अध्यक्षीय भाषनात बोलत होते.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक एस.टी.शिंदे,तर प्रमुख पाहुने म्हणून पोलिस उप निरिक्षक जि.डी.चित्ते,पेशकार गुलाब   शेख, सुशील पत्की,दत्तात्रय कांबळे, एन.पी.कोरे, ए.ए.मडके,माधव घोनसे,बालाजी गटलावार आदी उपस्थित होते.
या वेळी  दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व त्या नंतर आगारातिल सुर्क्षित सेवा बजावलेल्या चालक,वाहक व कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.
तर पोलिस उप निरिक्षक  जि.डी.चित्ते म्हणाले की,
हा सुरक्षितता पंधरवाडा केवळ पंधरा दिवसा पुरता न पाळता याचा नेहमीसाठी याचा अवलंब करावा.व  गाडी चालवताना वाहतुकिचे नियम पाळावे व आगारातिल चोरी प्रकर्णे वाढनार नाहीत याची दक्षता घ्यावी असे म्हाणाले.
या वेळी विठ्ठल भागवतकर , पि.एस.गायकवाड, प्रताप कोल्हे,बालाजी नगरे,प्रकाश वदुलवाड,उत्तम धोंड,मनोज कांबळे,सिध्दर्थ गंगावने,संग्राम शिकारे,बालाजी रिंदकवाले,आर.बी.बेतेवाड,आर.एम.फुलारी,या सह चालक, वाहक,यांञिकी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाची प्रास्तावना जि.पि.गोरडवार यांनी केले तर सुञसंचलन धनंजय जाधव यांनी तर आभार एस.व्ही.शिंदे यांनी मानले.