शिक्षकांना बी.एल.ओ.च्या अशैक्षणिक कामातून मुक्त करावे ; शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

बहुसंख्य शिक्षकांनी दिले तहसिलदार यांना निवेदन

मुखेड / पवन क्यादरकुंटे

तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुन प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बी.एल.ओ.च्या अशैक्षणिक कामातून मुक्त करावे यासाठी मुखेड तालुका  शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने दि. 10 जानेवारी 2020 रोजी मुखेड तहसिलदार काशिनाथ पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवडणुक व जगणनना या राष्ट्रीय कार्या व्यतिरिक्त मतदार यादया दुरुस्ती व अद्यावतीकरण या कार्यास तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांना प्रशासनाने जुंपले यामुळे विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असुन बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदींची उल्लंघन होत आहे.

तर नियमीत होणारी असंख्य प्रशिक्षणे, परिक्षा मुल्यामापनाची कार्ये, शिष्यवृत्ती व नवोदय परिक्षा पुर्वतयारी दैनंदिन अध्यापन या सारख्या नियमित कामा व्यतिरिक्त निवडणुकीचीही कामे शिक्षक करत असतात असे असतानाही आनखी मतदार यादयांच्या कार्यासाठी परत शिक्षकांनाच वेठीस धरले जात आहे. यामुळे शिक्षकांसोबतच पालकांच्याही मनात रोष निर्माण होत आहे यामुळे शिक्षकांना बी.एल.ओ.च्या अशैक्षणिक कामातून मुक्त करावे व अद्यापनाचे कार्य करु दयावे अशी मागणी यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांकडून तहसिलदार यांना करण्यात आली.

या निवेदनावर शिक्षक संघटना समन्वय समिती व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कराळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेना, शिक्षक संघाचे पदाधिकारी मारोती लंगोटे, गजानन पवितवार, व्यंकट पवित्रे, माधव माधसवाड, पदमाकर जवळदापके, भरत जाधव, लक्ष्मण करेवाड, राम टाकळे, किशन सिंगनवाड, नामदेव सुर्यवंशी, चंद्रकांत शेळके, सुरेश जाधव, नरसिंग जाधव, लक्ष्मण आतनुरे, बालाजी तलवारे, अरविंद थगनारे, सोमनाथ कुंभार यांच्यासह अनेक शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.