मुलांचं पोट भरण्यासाठी तीने आपले केस विकले ; १०० रुपयाचे मुलासाठी खाऊ घेतले तर ५० रुपयाचे…..

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

सेलम, तामिळनाडूः कर्जात आकंठ बुडालेल्या पतीने गेल्या महिन्यात आत्महत्या केली. यामुळे सेलमधील ३१ वर्षीय महिलेवर आपले केस विकून तीन मुलांचे पालनपोषण करण्याची वेळ आली. पतीचे सेल्वमकडे असलेले जे काही थोडेफार पैसे होते ते गेल्या शुक्रवारी संपले. प्रेमाकडे जगण्यासाठी एक पैसाही उरला नाही. त्यात तिला तीन लहान मुलं. एक मुलगा ५ वर्षांचा, दुसरा तीन आणि तिसरा दोन वर्षांचा आहे. अशा विदारक परिस्थितीत मुलांचे पालपोषण करण्याचं मोठं आव्हान तिच्यासमोर आहे. प्रेमाने नातलग आणि ओळखीच्या लोकांसमो आर्थिक मदत मागितली. पण तिला कुणीही मदत केली नाही.

प्रेमा आणि तिचा पती सेल्वम हे वीटभट्टीवर रोजंदारीने काम करत होते. पण सेल्वमला छोटा व्यवसाय सुरू करायचा होता. यामुळे त्याने २.५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. पण त्यात त्याची फसवणूक झाली आणि संपूर्ण कुटुंब कर्जात बुडाले. यामुळे धक्का बसलेल्या सेल्वमने आत्महत्या केली. ज्यांच्याकडून त्याने कर्ज घेतले होते त्यांनी प्रेमाकडे पैशांसाठी तगादा लावला. यामुळे निराश झालेल्या प्रेमानेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तिने विगसाठी तिचे केस मागितले. त्याने १५० रुपयांत तिचे केस विकत घेण्याची तयारी दर्शवली. मुलांसाठी तिने आपले केस विकले. या दीडशे रुपयांपैकी १०० रुपयांचे तिने मुलांसाठी खाद्यपदार्थ घेतली. यानंतर ती कीटकनाशकं घेण्यासाठी दुकानावर गेली. पण दुकानदाराला संशय आल्याने त्याने तिला बाटली देण्यास नकार दिला.

मग निराश झालेल्या प्रेमाने विषारी बिया खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तिच्या बहिणीने तिला आडवलं. मन हेलावून टाकणारी प्रेमाची ही कहाणी एका ग्राफिक्स डिजायनर जी. बाला याने सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाली आणि यानंतर प्रेमासाठी मदतीचा ओघ सुरू झाला. तिला आतापर्यंत १.४५ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. तसंच सेलम जिल्हा प्रशासनाने प्रेमाला विधवा महिलांना देण्यात येणारी महिन्याची पेन्शनही लागू केली आहे. तसंच बालाच्या मित्राने प्रेमाला वीटभट्टीवर कामही दिलंय.