नांजिमस बँक अंबुलगा बु दुष्काळ अनुदान वाटप अल्फाबेटीकल Z नावाकडुन सुरूवात करा – आकाश पाटील वडजे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड: पवन कँदरकुंठे
         नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंबुलगा बु ता.मुखेड येथील शाखेत दुष्काळ अनुदान वाटपास सुरूवात झालेले आहे. सविस्तर व्रत्त असे की, दरवेळी दत्तक गावामधुन A अल्फाबेटीक नावाकडुन वाटप सुरूवात करीत आहेत. परंतु प्रत्येकवेळी खालील गावांचा वाटप ऊशीरा होत आहे प्रत्येक वेळी खालील गावावरच अन्याय का ?
म्हणुन यावेळी अल्फाबेटीक Z कडुन सुरूवात करावे म्हणजे सर्व गावांना न्याय मिळेल. किंवा एक गाव A नावाचे व दुसरे गाव Z नावाचे असे केल्याने शेतकर्यांमधील असंतोष कमी होईल व सर्वांना पैसे वेळेवर मिळतील . म्हणुन वरिष्ठ बँक अधिकार्यांशी संपर्क करून खालुन Z कडुनही दुष्काळ निधी वाटप करावे असे आदेश द्यावे. अशी मागणी दि. 9 जाने रोजी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्याकडे आकाश पाटील वडजे यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी,माधव पसाटे,जळसींग सुय्रवंशी ई. शेतकरी ऊपस्थीत होते.