इंग्लिश ओलंपियाड परीक्षेत   जिजाऊ ज्ञानमंदिरचे यश

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड :  प्रतिनिधी
        एसओएफ च्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलंपियाड २०१९-२० या परीक्षेत मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिरच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले असून त्या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्याचा संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड यांनी  सत्कार केला तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतूक केले .
      इयत्ता पहिलीतून यश जगदीश जोगदंड, दूसरीतून जीवनदीप जगदीप जोगदंड, तिसरीतून सोमेश बापूसाहेब वडजे, पाचवीतून गणेश बळीराम बरमे, सहावीतून हरिओम रामदास शिंदे या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकविले आहे. तसेच दुसरीतून आदित्य मोहन आंदूरे, सिल्वर मेडल, तिसरीतून शिवदर्शन राम बारूळकर ब्रांझ मेडल घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. बालवयापासूनच विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरील स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या उद्देशाने अशा व अन्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन शाळेमार्फत केले जाते.
            या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यात परीक्षेविषयीची भिती मनातून निघून जाते व परीक्षा म्हणजे एक आवडता गुणांकांचा खेळ होऊन बसतो. हा अनुभव विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक, शाळेचे व पालकांचे नावलौकिक यांच्यासाठी ही महत्वाचा आहे. या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनस्वी अभिनंदन,कौतूक व समाधान व्यक्त केले आहे .