भविष्यात मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकते– देवेंद्र फडणवीस

ठळक घडामोडी महाराष्ट्र

सध्या राज्याच्या राजकारणात एका नव्या समीकरणाची चर्चा सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपासोबत युती करण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही राज ठाकरे भाजपासोबत जाऊ शकतात असे संकेत दिले होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना आपली भेटच झाली नसल्याचा दावा केला आहे. मात्र यावेळी त्यांनी भविष्यात मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकते असे संकेतही दिले आहेत. लोकमतच्या सरपंच पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

आज तरी सध्या अशी कोणतीच शक्यता नाही. आमचा व्यापक दृष्टीकोन आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने सर्व घटकपक्षांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे आज तरी अशी परिस्थिती दिसत नाही. भविष्यात ते व्यापक विचाराने चालणार असतील तर त्यावेळी विचार केला जाईल,” असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.