जिजाऊ ज्ञानमंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड  / ज्ञानेश्वर डोईजड

जिजाऊ ज्ञानमंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . अनेक चिमुकल्या बालिका सवित्रीचा वेश परिधान करून आल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.

             या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानोबा जोगदंड सर होते .तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. पांचाळ मॅडम होत्या .स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली .त्यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते झाली.
            सावित्रीच्या वेशात आलेल्या बालकांनी ‘मी सावित्री बोलते ‘!असे म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अध्यक्षीय भाषणात श्री. ज्ञानोबा जोगदंड सर यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती व सध्याची परिस्थिती आणि यामध्ये सावित्री चे योगदान याविषयी मार्गदर्शन केले .आणि शेवटी सावित्रीच्या जीवनावर आधारित सुंदरशी कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्सवात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गीते मॅडम यांनी केले