राजूरा कॉलेज येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / पवन जगडमवार
            प्रतिनिधी – मुखेड तालुक्यातील मौजे राजूरा येथिल क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयात दि 3 जानेवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.  बी रानशेवार सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व त्या नंतर महाविद्यालयातील सर्व  शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थीनीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व अतिशय उत्साहात सावित्रीबाई फुले यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आले तसेच महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत वेक्त केले.
शिक्षणाची संधी मुलींना मिळाले पाहिजे हा ध्यास घेऊन ज्ञानाची गंगा घराघरात पोहोचविण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले या थोर समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले – असे ग्रंथपाल आनंद जंगमवाड यांनी सांगितले
तर महाविद्यालयातील विद्यार्थी अनिल पांचाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बोलताना सांगितले की कर्मठ ब्राह्मणी व्यवस्थेने मुलींना शिक्षणाची दारे बंद केली होती. मुलींना शिक्षणाच अधिकार नव्हता. चुल आणि मुल या विकृत मनुवादी मानसिकतेमुळे मुली शिक्षणापासून वंचित होत्या. मुलींना शिक्षण घेता आले पाहिजे, शिक्षणाशिवाय उपाय नाही. हे ज्योतिबांंना कळले होते. सावित्रींच्या शिक्षणाला कर्मठ ब्राम्हणांनी विरोध केला, परंतु ज्योतिबांनी त्याला न जुमानता शिक्षण दिले. 1 जानेवारी 1848 साली पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात मुलीची पहिला शाळा स्थापन केली. सावित्रीबाई भारतातील पहिल्या स्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. सुरूवातीला शाळेमध्ये 6 मुली होत्या, परंतु 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 45 वर जाऊन पोहोचली. शाळेतील वाढती संख्या पाहून सनातन्यांनी विरोध सुरू केला. ते ‘धर्म बुडविला, जग बुडणार’ असे लोकांना सांगू लागले. सावित्रींच्या अंगावर शेण फेकले गेले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. परंतु सावित्री मागे हटल्या नाही. सनातनी कर्मठांच्या विरोधाला तोंंड देत शिक्षण प्रसाराचे काम चालू ठेवले. संघर्ष तीव्र होत गेल्यावर त्यांना घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. स्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंंनी ओळखले असे सविस्तर माहिती सांगितले व त्या नंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक आर .टी नवेकर, हिवराळे, पाटील एच.एन,वाघमारे ,कदम जी के,श्रीमंगले, गजले, मुंगडे, पांचाळ, जाधव ए बी,एन.आर पोटफोडे, पी. जी पोटफोडे, डोपेवार, कारागिर सर, कदम एम. एम, उदगिरे जे. ए, काळे आर. टी, सेवक अम्रत झरे यांच्या सह महाविद्यालयात सर्व शिक्षक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.