आंबुलगा गावातील महिला सरसावल्या गरीबी चे निर्मुलन करण्यासाठी

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / पवन जगडमवार
        प्रतिनिधी –  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियान अंतर्गत चार महिला वर्धनी मँडम ची एक टिम मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा या गावी आली होती. आंबुलगा या गावात आल्यावर त्यांनी गावतील ग्रामपंचायती चे सरपंच सौ. सुशिलाताई आकुलवाड,उपसरपंच विनोंद गोविंदवार, ग्रांमपंचायतीचे सदस्य यांना घेऊन व गावातील काही महिलांना घेऊन रात्रीच्या वेळी गावात एक मशाल रँली काढून उमेद अभियानाचा एक च नारा उमेद अभियानाचे गट करा, आम्ही आलो तुमच्या दारी गट करा घरोघरी, गावचा विकास कशाला गरीबीचे निर्मुलन करायला, मुलगी शिकली प्रगती झाली, गरीबी निर्मुलन झालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा देऊन मशाल रँली काढून महिलान मध्ये उमेद अभियाना बद्दल जनजागृती करण्यात आले,
त्या नंतर हे महिला वर्धनी मँडम आंबुलगा या गावातील गरीब, गरजू, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, अपंग तसेच महिलांच्या परिस्थितीचा तळागाळा पर्यंत जाऊन प्रतेक कुटूंबाची सविस्तर माहिती घेतले या महिला वर्धनी मँडम आंबुलगा येथे एक पंधरा दिवस मुक्कामी राहून महिलांना एकत्र केले व त्यांना उमेद अभियानाचे गट करायला सांगितले, महिलांना बचत गटाचे महत्व पटवून दिले. त्यात बचत कशी करावी, महिलांनी सक्षम कसे व्हावे, महिलांनी उद्योगाकडे कसे वळावे, बचत गटाचे अनुदान जमा होणारी रक्कम वाटप केलेल्या रक्कमेचे व्याज व पुढे जाऊन बँकेकडून लोन कसे मिळवावे, मग महिलांनी त्या पैशातून उद्योग कसे करावेत, या बाबत ची बचत गटा बद्दलची सविस्तर माहिती महिलांना पटवून दिले ,
आंबुलगा या गावात त्यांनी तब्बल 21 गट तयार केले प्रतेक गटात दहा बारा महिला आहेत अशा प्रकारे त्यांनी 250 महिलांना एकत्रित करून त्यांचे महिला बचत गट तयार करून महिलांना सक्षम बनवण्यासाठी वर्धनी संध्या मिलिंद परघणे हदगाव, संघमित्रा शिवाजी कांबळे मुदखेड, संध्या अर्जुन खोडके नांदेड, तायराबी शफिक शेख नायगाव, यांनी आंबुलगा या गावी येऊन गावातील महिलाचे बचत गट तयार करून मौलाचे कार्य केले त्यामुळे 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आंबुलगा येथिल ग्रामपंचायतीच्या वतीने व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने शाल व श्रीफळ देऊन गावकय्राच्या समोर जंगी सत्कार करण्यात आले.या या स्वंयसहायता समुह मुख्य प्रभाग समन्वयक अश्विनी मुंडे मँडम यांचे सत्कार राहूबाई गणपत आकुलवाड यांनी केले तर या वर्धनी मँडम ना तालुका व्यवस्थापक कंधारे सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले या वर्धनी मँडम चे सत्कार कॉ अनुराधा अंकुश अंबुलगेकर, कॉ पार्वती बालाजी माळी रुक्मिणबाई विठ्ठल कौरवाड, निर्मला सोनंकांबळे अदीने केले यावेळी ग्रामसेवक बारमाळे, गणपतराव आकुलवाड, पोलीस पा विठ्ठल कौरवाड,पत्रकार पवन जगडमवार, यादव आकुलवाड, शेतमजूर युनियन चे अध्यक्ष कॉ पंडरी देशटवाड, सचिव कॉ रामराव यामावाड, कॉ अमिर खुरेशी, रामराव मांजरमे अदीची प्रमुख उपस्थिती होती तर कॉ मानिक गोणशेट्टवाड,  सुरेश मामीलवाड, कॉ गंगाधर मांजरमे, मोईनसाहब खुरेशी, कॉ अनिल पांचाळ, ग्रा.प ऑपरेटर शैलेश गंदीगुड्डे, सेवक माधव कांबळे अदीने कार्यक्रम यक्षस्वी करण्यासाठी प्रयत्न केले होते.