अवैधरित्या मुरूम उत्खनन ; ४ कोटी ३८लाख ९० हजार दंडास पाञची महसूल विभागाची कार्यवाही ; रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड राष्ट्रीय

     महसूल विभागाने रुद्राणी व शारदा कंन्स्ट्रक्शनकडे लक्ष देण्याची गरज !

मुखेड / प्रतिनिधी
          मुखेड तालुक्यातून नांदेड व बिदर राष्ट्रीय महामार्गाच्या  मुक्रमाबाद ,वळंकी,वंटगीर येथील वनजमीन , गायरान  वरील  वळंकी   गट .क्र.२४ व वंटगीर गट.क्र ९३.मधून कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करून महसूल विभागाला लाखो रूपयांचे चूना लावण्याचे काम कंन्स्ट्रक्शने केले याबाबत संबंधित विभागाकडून यांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी रयत क्रांती युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तहसीलदार यांच्याकडे शारदा कंन्स्ट्रक्शन, रुद्राणी कंन्स्ट्रक्शन व अजयदीप कंन्स्ट्रक्शन याच्याबाबत एका निवेदनाव्दारे तक्रार करताच महसूल विभागाने अवैधरित्या मुरूम उत्खनन केलेल्या अजयदीप कंन्स्ट्रक्शनवर ४ कोटी ३८ लाख ९० हजार दंडास पाञची कार्यवाही केली.
           गेल्या दोन वर्षांपासून दिवस राञ एक्सकॅव्हेर मशीनच्या सहाय्याने तीन टीप्पर वाहतूक करून टाटा एक्सकॅव्हेटर मशीनच्या व तुळजाभवानी अर्थव्हर्स यांच्या द्वारे वंटगीर,वळंकी लखमापूर येथील गायरान व वनजमीन गट.क्र.९३ मधून ३९.९००ब्रास अवैध मुरूम उत्खनन केलेल्या आढळून आले आहे. एम.एच-२४,.जे ८८९९ , एम. एच.४३- वाय ६८२४, एम. एच.-२२,३१६०,  या टीप्पर च्या सायाने वंटगीर,वळंकी लखमापूर येथील गायरान व वनजमीनीवरील अवैध मुरूमाचे उत्खनन करून महसूल विभागाला लाखो  रूपयांचे  चूना लावण्याचे काम अजयदिप कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आले .
        महाराष्ट्र शासनाच्या नियमा प्रमाणे कलम ८४(७)व(८) प्रमाणे गौण खनिजाची अवैध वाहतूक केल्यामुळे तिन टीप्पराचे एकूण साठ लाख रूपये प्रमाणे तसेच दोन एक्सकॅव्हेटर मशीनच्या पंधरा लाख रूपये अवैध मुरूम वाहतुकीचे ३९.९००ब्रास मुरूम बाजार भाव प्रमाणे ६००रूपये असे एकूण दोन कोटी एकोनचाळीस लाख चाळीस हजार रुपये असे एवडाढा दंड अजयदिप कन्स्ट्रक्शन कंपनी वर आकारण्यास येण्यास योग्य राहील असे महसूल विभागाचे पंचनामे केली आहे. वळंकी येथील वनजमीनीवरील अवैध मुरूमाचे उत्खनन केली आहे.


      अजयदिप कन्स्ट्रक्शन कंपनीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  १६१ (अ) मोठ्या प्रमाणावर कामे चालू आसताना वळंकी वनजमीनीतून विनापरवाना २८,५००ब्रास मुरूम एवडे मुरूम उत्खनन केलेली आहे. उत्खनन करीत असताना एक्सकॅव्हेटर मशीनचे ७५००००,हजार रुपये तसेच २८५००ब्रास मुरूम प्रमाणे प्रति.६००,प्रमाणे एक कोटी एक्काहत्तर लाख रूपये असे,१,७८,५००००.एक कोटी आठयाहतर लाख पन्नास हजार रुपये एवडा दंडात्मक अजयदिप कन्स्ट्रक्शन कंपनी वर आकारण्यास योगय राहील असे महसूल विभागाच मंडळ अधिकारी बी.डी. मुंडे , मुक्रमाबाद सज्जा चे तलाठी डी.जी.रातोळीकर,तलाठी एम. पदाजी,  तलाठी सुनिता स्वामी.यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी होते.