आंबुलगा येथील शेतकऱ्याने शेतातील कापूस उपडून बांधावर टाकले

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुखेड
मुखेड / पवन जगडमवार
    मुखेड तालुका हा डोंगराळ व खडकाळ भाग म्हणून ओळखले जाते दरवर्षी या तालुक्यात भयंकर मोठा दुष्काळ पडलेला असतो दरवर्षी या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो,
          मात्र गेल्या वर्षी 2019 च्या जून महिन्यात चांगला पाऊस पडला त्यामुळे मुखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेवर कापूस पिकाची लावणी केली होती, मात्र नंतर झालेल्या अतिवृष्टी व वाय्रा वादळामुळे मुखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्याचे कापसाचे मोठे नुकसान झाले होते.
        मात्र काही शेतकऱ्यांचे कापूस कमी उंची असल्याने त्याचे फारसे नुकसान झाले नव्हते, कापसाचे उत्पादन ही चांगले होते आणि त्या कापसाच्या मालाला  भाव ही चांगला मिळतो अशी आशा ठेऊन शेतकरी कापसाची लागवड करत असतो कापूस लागवडीसाठी खर्च ही खुप लागतो, पंरतु उत्पादन चांगले झाले आणि कापसाच्या मालाला जर भाव आसेल तर पैसा ही तसाच चांगला मिळतो अशी आशा ठेवून मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा येथिल शेतकरी मनिष देसाई यांनी त्यांच्या शेतात सात बँग कापसाची लावणी केली कापूस ही चांगले आले होते कापसाची उंची ही वाढली होती, कापसावर योग्य वेळी त्यांनी खत फवारणी केली होती आणि पाणी पण दिले होते मात्र त्याच्या कापसावर लाल्या रोगाने धुमाकूळ घातला आणि सर्व कापसावर लाल्या रोग पसरला त्यांनी सर्व प्रकारची फवारणी करून पाहिले मात्र ते येक्षस्वी झाले नाही त्यांच्या कापसावर लाल्या रोग पसरला त्यामुळे कापसाच्या झाडाची पाने लाल होऊन गळून पडत होती, तर कापसाच्या बोंडात लाल रंगाची अळी होती, ती बोंडातच असल्यामुळे कापसाला किड लागू लागली, आणि कापूस किडू लागले, त्याचबरोबर चाप, कळी ही गळू लागली त्यामुळे त्यांनी वैतागून चेक सात बँग लावले कापूस आज दि 2 जानेवारी रोजी उपडून बांधावर टाकले आणि सात बँग लावलेल्या कापसावर आत्तापर्यंत त्यांना फक्त विस किव्हटंल कापूस निघाले, इतका खर्च करून फवारणी, खत घालून पाणी देऊन जर बँगला तीन किव्हंटलचा ही ऑवरेज आला नसल्याने आम्ही हे कापूस उपडून टाकत आहोत अशी माहिती मनिष देसाई यांच्या शेतातील मजूर लक्ष्मण मंत्री, शंकर पांचाळ, मारोती कोमवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे