रामदास कदमही ‘नेतेपद’ सोडण्याच्या तयारीत..शिवसेनेत नाराजीनाट्य सुरूच !

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे अनेक आमदार हे नाराज आहेत. अनेक आमदारांनी आपली नाराजी माध्यमांसमोर येऊन व्यक्तही केली आहे. तर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे देखील नाराज असल्याचं वृत्त आल आहे. मंत्रिपद न मिळाल्याने रामदास कदम आपल्या नेते पदाचाही राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे.

रामदास कदम हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी फडणवीस सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रिपद भूषवले होते.त्यावेळी रामदास कदम यांना पर्यावरण खात देण्यात आलं होत. या पदावर कामा करताना कदम यांनी प्लास्टिक बंदीचा धडाडीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कदम यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र असे झाले नाही. शिवसेनेकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

दरम्यान शिवसेनचे आ. प्रताप सरनाईक यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘आज आमची लायकी नाही, असे कदाचित पक्षाला वाटत असेल. मात्र, आम्ही आमची लायकी सिद्ध करू आणि पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू,’ अशा शब्दांत नाराजी सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच खुद्द संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनाही मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांनाहे डावलण्यात आल आहे. त्यामुळे ते ही नाराज असल्याचं बोललं जात आहे. तर एका वृत्तवाहिनीनुसार सुनिल राऊत हे आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले होते. मात्र हे वृत्त खोत असल्याचं खुद्द सुनील राऊत यांनी सांगितले आहे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतचं राहणार, असे ते म्हणाले.