गड किल्ल्यांवर थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्या हुल्लडबाजांवर होणार कारवाई

ठळक घडामोडी महाराष्ट्र

         थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना वन विभागाने दिली आहे. शहरात विविध ठिकाणी पार्ट्या, संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. तर काही हुल्लडबाज गड किल्ल्यांवर थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांसाठी जात असतात. त्यामुळे अशा गड किल्ल्यांवर थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यां हुल्लडबाजांवर वन्य व संरक्षण अधिनियम 1972 आणि भारतीय वन अधिनियमन 1927 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गड किल्ल्यावर 31 डिसेंबर साजरा कराल तर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे सूर्यास्त होण्याआधीच गड किल्ले, वनक्षेत्रातून बाहेर पडण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत. तसेच गड किल्ले, अभयारण्य परिसरात कोणी पार्टी करताना आढळल्यास वन्य व संरक्षण अधिनियम 1972 आणि भारतीय वन अधिनियमन 1927 नुसार कारवाई होणार आहे. अशी माहितीही कळविण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री सात हजार पोलिस रस्त्यावर तैनात राहणार आहेत. राज्य सरकारने सर्व अस्थापना पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे त्या दृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. महिला सुरक्षा व कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके गर्दीच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.