मंडलापुरकरच्या बॅनरमधुन बेटमोगरेकर बंधु “आऊट” कॉग्रेस अडकली गटातटाच्या राजकारणात !

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना महाविकासआघाडीत कॅबिनेट दर्जा दिल्याने शहरात कॉग्रेस तालुकाध्यक्ष तथा मुखेड – कंधार विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविलेले भाऊसाहेब मंडलापुरकर यांनी बॅनर लावले त्यात बेटमोगरेकर बंधुंना बॅनरमधुन ” आऊट ” केल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

याअगोदरही अशेाकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावले होते त्यातही बेटमोगरेकर बंधुचा पत्ता कट केल्याचे शहरात एकच चर्चा होती. तर मंडलापुरकर यांना मुखेड – कंधार विधानसभा निवडणूकीच्या वेळी बेटमोगरेकर बंधुंनी हात दिल्याने बॅनर मधुन आऊट केल्याची माहिती आहे पण कितपत खरे यावर मात्र पुष्टी होऊ शकली नाही. तर याबाबत मंडलापुरकर यांना फोन केला असता त्यांना यावर बोलण्यास टाळले.

 


          बॅनरमध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते आहेत तर जिल्हयातील सुध्दा बडे नेते आहेत. पण तालुक्यातील एकही नेता दिसत नाही.