शिवसेनेच्या बड्या नेत्यांना डावलून आदित्य ठाकरेंना मंत्रीमंडळात संधी

ठळक घडामोडी महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराची यादी राजभवनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी उघड दिसून येत आहे. शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवत ठाकरे घराण्यात नवा पायंडा पाडला होता. त्यानंतर आदित्य़ ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा त्यांच्या समर्थकांनी व्यक्त करून दाखवली होती. शिवसेनेने युती तोडल्य़ानंतर नवे सहकारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सत्तेसाठी जवळ करावे लागले. यावेळी झालेल्या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

 

सुनील राऊत सोमवारी दुपारपर्यंत कुणाच्याही संपर्कात नव्हते. आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीतही ते असल्याचे सांगण्यात आहे. सुनील प्रभू, रविंद्र वायकर, प्रताप सरनाईक, दिवाकर रावते, दिपक केसरकर, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत, तसेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सचिन अहिर आदींना मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे सत्तास्थापनेच्या नाट्यात आमदार फुटण्याची भीती असताना शिवसेनेचा गड सांभाळणाऱ्या नेत्यांचीही या यादीत नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे.