मुखेड येथे भीमाई व्याख्यानमालेत विपश्यना: परिचय व अनुभूती या विषयावर व्याख्यान

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / संदिप पिल्लेवाड
         मातोश्री भीमाई व्यख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने दि.3 जानेवारी  रोज शुक्रवारी सायंकाळी 6.00 वाजता कोत्तावार ऑईल मील बा·हाळी रोड येथे ,विपश्यना: परिचय व अनुभूती (मनाची एकाग्रता, समग्रता व तणावमुक्ती) या विषयावर महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभागाचे निवृत्त आयुक्त,  आर.के.गायकवाड व शासकीय वौद्यकीय महाविद्यालय नांदेडचे माजी अधिष्ठाता तथा विपश्यनाचार्य डॉ.श्रीराम राठोड हे भीमाई व्याख्यानमालेचे नववे पुष्प गुंफणार आहेत.
             व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते तथा जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे रहाणार असून यावेळी  उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक शिवाजीराव आंबुलगेकर यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मुखेड येथील सुप्रशिध्द् सर्पदंश चिकित्सक मुखेड भूषण डॉ.दिलीप पुंडे यांनी गेल्या आठ वर्षापुर्वी  आपल्या आईच्या नावाने मातोश्री भीमाई व्याख्यानमालेस सुरुवात केली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मुंबई येथील प्रशिद्ध व्याख्याते प्रशांत मोरे यांनी आई या विषयावर गुंफले, दुसरे पुष्प सातारा येथील प्रशिद्ध व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे यांनी सुंदर जगण्यासाठी या विषयावर गुंफले, तिसरे पुष्प सातारा येथील डॉ.राजेंद्र पवार यांनी सुजाण पालकत्व या विषयावर गुंफले, चौथे पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील सुप्रसिद्ध वक्ते प्रा.तेज निवळीकर यांनी एकविसाव्या शतकासमोरील आव्हाणे या विषयावर गुंफले. पाचवे पुष्प पुणे येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक  तथा सुप्रसिद्ध वक्ते डॉ.रामचंद्र देखणे यांनी ज्ञानदेवे रचिला पाया.. तुका झालासे कळस.. या विषयावर गुंफले. सहावे पुष्प जेष्ठ समाजसेवक तथा जीवनशौली व आरोग्य विषयाचे अभ्यासक अमरावती येथील डॉ.अविनाश सावजी यांनी  शतायुषी व्हा, पासवर्ड आरोग्याचा या विषयावर गुफले. सातवे पुष्प ताण तणाव व नातेसंबंध समूपदेशक डॉ.सचिन देशमुख हे स्वभावालाही औषध असते या विषयावर गुंफले. आठवे पुष्प ब्रँड अॅम्ब्ॉसेडर,स्थूलता निवारण अभियान,महाराष्ट्र शासनाचे डॉ.जगन्नाथ दीक्षित हे विनासायास वेट लॉस व मधुमेह प्रतिबंध या विषयावर गुंफले तर दि. 3 जानेवारी रोज शुक्रवारी विपश्यना: परिचय व अनुभूती (मनाची एकाग्रता, समग्रता व तणावमुक्ती) या विषयावर महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभागाचे निवृत्त आयुक्त,  आर.के.गायकवाड व शासकीय वौद्यकीय महाविद्यालय नांदेडचे माजी अधिष्ठाता तथा विपश्यनाचार्य डॉ.श्रीराम राठोड हे भीमाई व्याख्यानमालेचे नववे पुष्प गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन, आयोजक मुखेडभूषण डॉ.दिलीप पुंडे, सौ.माला पुंडे,डॉ.गौरव पुंडे, डॉ.सौ.तेजस्विनी पुंडे यांच्यासह मातोश्री भीमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने  करण्यात आले आहे.