भाजपा जिल्हाध्यक्षपदी गोजेगावकर तर महानगराध्यक्षपदी साले यांची निवड

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा मुखेड

मुक्रमाबाद / दत्ता पा माळेगावे

भारतीय जनता पार्टी नांदेड (ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी जि.प.सदस्य तथा गटनेते व्यंकटराव पा गोजेगावकर यांची निवड झाली तर नांदेड महानगराध्यक्षपदी प्रविण साले यांची फेरनिवड दि. 28 रोजी झाली.

नांदेड भाजपाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी निष्ठावंत म्हणुन श्रावण पा भिलंवडे यांचर वर्णी लागण्याची दाट शक्यता होती पण पुन्हा एकदा त्यांना डावलुन मुखेड तालुक्यातील भाजपा जेष्ठ नेते व मागील पाच वषापुर्वी भाजपात आलेले व्यंकटराव पा.गोजेगावकर यांची निवड करण्यात आली तर या पदासाठी देविदास राठोड यांचे नाव सुध्दा आघाडीवर होते.

या निवडीच्या वेळी   नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , निवडणूक अधिकारी भागवत कराड , माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर , आमदार राम पाटील रातोळीकर , आमदार तुषार राठोड , आमदार राजेश पवार माजी आमदार पोकर्णा व इतर पदाधिकारी हजर होते.